पुणे : राज्य शासनाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा ४टक्के पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये होत आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे. तर, “पुण्यात निर्बंध शिथिल करायचे असतील तर प्रस्ताव पाठवा, असं आरोग्यमंत्री म्हणाले. मग प्रश्न हा पडतोय, असा प्रस्ताव मुंबईने आणि शिथीलता दिलेल्या इतर जिल्ह्यांनी दिला होता का?” असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाविकासआघाडी सरकारला सवाल केला आहे.
याचबरोबर “खरं तर मुंबई आणि इतर जिल्ह्यात शिथिलता देताना त्यांच्याकडून कोणते प्रस्ताव दिले होते? प्रस्ताव मागवून शिथिलता द्यायची? अशी प्रक्रिया कधी सुरू झाली? पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मागणी करत आलो आहे. पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात, मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात. तर आरोग्यमंत्र्यांची भूमिका वेगळीच असते. मात्र तरीही या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार आहोत, असा शब्द व्यापारी प्रतिनिधींना दिला.” असं देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा; ‘अनलॉक’ बाबत टोपेंची भूमिका
- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी अखेर निधी उपलब्ध !
- मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील
- कसोटीत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर पाचव्यांदा बाद; जाणून घ्या आधीचे रेकॉर्ड्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
