Share

‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचे नाव उंचावत पदके पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, काँग्रेससह विरोधकांनी मोदींच्या या निर्णयाला विरोध करत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे.

आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटकरून मोदी सरकारला खोचक टोला लगावलाय. ‘ “जनतेची मागणी” म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे… चांगलं आहे. जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत १- महागाई कमी करा, २- युवकांना रोजगार द्या, ३- महिलांना सुरक्षा द्या, ४- शेतकऱ्यांना सन्मान द्या, ५- राजीनामा द्या’ असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!