पुणे : राज्य शासनाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ,अमृता फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्के पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये निर्माण होत आहे. राज्य सरकारने अशा प्रकारे दुजाभाव करणे हे रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण आहे.’
दरम्यान, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी 4 टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असून या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नाही म्हणून असंतोष निर्माण करू नका; हवं तर मराठा आरक्षणाचे श्रेय देखील घ्या पण…’
- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी अखेर निधी उपलब्ध !
- मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील
- कसोटीत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर पाचव्यांदा बाद; जाणून घ्या आधीचे रेकॉर्ड्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
