नवी दिल्ली- इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. १८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजानी १७७ धावांत रोखले.
या विजयामुळे भारताने ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. शनिवारी होणारा अंतिम सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन यानं फिटनेस टेस्ट पास केली असून तो पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध आहे.
यादरम्यान, यजमान संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतग्रस्त झाला आणि 15व्या ओव्हरनंतर मैदान सोडून बाहेर पडला. मिड-विकेट दरम्यान फिल्डिंग करताना कोहलीला दुखापत झाली आणि दुसरी धाव थांबवण्याच्या अयशस्वी प्रयत्नात त्याने आपला संतुलन गमावले. यानंतर कोहली मैदानाबाहेर गेला तेव्हा रोहित शर्माने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली.
5 सामन्यांची मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारताने 8 धावांनी विजय मिळवल्याच्यानंतर विराट मैदानावर येताना लंगडताना दिसत होता. पण त्याची दुखापत गंभीर नसून 20 मार्च रोजी होणाऱ्या मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी तो बरा होईल, असे कोहली म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपाचा जीव भांड्यात पडला! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे म्हणजे अत्याचार नव्हे
- अंबाबाईच्या मंदिरात संध्याकाळी सहानंतर प्रवेश मिळणार नाही
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य; न्यायालयाच्या ‘त्या’ सल्ल्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया


