Share

ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. राज्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे.अनेक ठिकाणी कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन होताना दिसत असल्याने आता ठाकरे सरकारने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली असून कोरोनाबाबत नव्याने आदेश जारी करण्यात आले असून त्यात अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत.

राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नव्या रुग्णांपैकी 80.63% रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत.गेल्या 24 तासांत 39,726 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात नव्या प्रतिदिन नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 65% म्हणजे 25,833 रुग्ण आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ पंजाब मध्ये 2,369 आणि केरळमध्ये 1899 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील आठ राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!