Share

मनपाचा जीव भांड्यात पडला! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

औरंगाबाद : स्मार्ट सिटी मिशनच्या केंद्रीय सचिवांनी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला उर्वरीत निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच महापालिकेला स्मार्ट सिटीसाठी द्यावा लागणारा स्वहिस्सा अदा करण्यासाठी त्यांनी एक वर्षांची मुदत देखील दिली आहे. यामुळे पालिकेला मोठा दिलासा मिळाला असून शासनाकडून निधी मिळताच स्मार्ट सिटीअंतर्गत प्रस्तावित कामे सुरू करता येतील, असा विश्वास पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केला.

एक हजार कोटी रूपयांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पालिकेला केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत. तर राज्य सरकार व पालिकेचा प्रत्येकी २५० कोटी रुपयांचा हिस्सा त्यात द्यावा लागणार आहे. यापैकी केंद्र व राज्य सरकारने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला पहिल्या दोन टप्प्यांचा निधी दिला.

मात्र पालिकेने २५० कोटी रुपयांपैकी एक रुपया देखील स्मार्ट सिटीसाठी आजवर दिलेला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच्या बैठकीतच केंद्र सरकारचे उपसचिव कुणालकुमार यांनी पालिकेला ठणकावत जोपर्यंत पालिका स्वहिस्स्याची रक्कम भरत नाही तोवर स्मार्ट सिटीसाठीच्या निधीचा पुढचा टप्पा केंद्र सरकार देणार नाही, असे बजावले होते.

मात्र पालिकेची आर्थिक स्थिती स्वनिधी भरण्यासारखी नसल्याने पालिकेकडून स्वहिस्सा भरला जाणार नाही आणि सरकारकडून औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी पैसा मिळणार नाही, असे मानले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी पालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय हे दिल्लीला गेले होते.

या दौर्‍यात त्यांनी केंद्रीय उपसचिव कुणालकुमार यांची भेट घेतली. याबद्दल पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. त्यानुसार कुणालकुमार यांना पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे त्यांनी मार्च २०२२ पर्यंत पालिकेला स्वहिस्सा भरण्याची मुभा दिली.

लगेच मिळणार निधीचा पुढचा टप्पा
पालिकेला एक वर्षाची मुद देतांना केंद्र सरकारकडून येणार्‍या स्मार्ट सिटीसाठीचा पैसा थांबवणार नाही, निधीचा पुढचा टप्पा लगेच दिला जाईल, असेही आश्वासन कुणालकुमार यांनी दिले. त्यामुळे निधी मिळेल आणि स्मार्ट सिटीची कामे पुन्हा गतीने सुरू होतील, असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!