Share

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे म्हणजे अत्याचार नव्हे

Published On: 

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध म्हणजे अत्याचार नव्हे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल सात वर्षांनंतर २५ वर्षीय युवतीने आरोपीविरुद्ध दाखल केला होता. यावर निर्णय देताना न्या. झेड. ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांनी तो गुन्हा रद्द केला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, पवन गणेश चौरागडे (३०, रा. आकोटखेड, जि. अकोला), असे गुन्हा रद्द झालेल्या युवकाचे नाव आहे. २०१२ मध्ये आरोपी आणि युवती एका लग्नसमारंभात भेटले. त्यांची ओळख होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला, असा आरोप करून तिने प्रथम अमरावती येथील परतवाडा पोलीस ठाण्यात जानेवारी २०१९मध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, (एन) २, ४१७, सेक्शन ३, ४ ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा रद्द करण्याकरिता आरोपीने हायकोर्टात अर्ज केला. बचाव पक्षाने सांगितले की, आरोपीने युवतीला कोणतेही लग्नाचे आमिष दिले नाही. युवती २५ ते २६ वयोगटातील आहे. आरोपी व युवतीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत. त्यामुळे यास लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला, असे म्हणता येणार नाही. तसेच तक्रार ही सात वर्षांनंतर देण्यात आली होती. हायकोर्टाने बचाव पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपीविरुद्ध दाखल असलेला गुन्हा रद्द केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!