कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भागामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अशातच आता खबरदारी म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराची दर्शनाची वेळ बदलण्यात आली आहे.
अंबाबाईच्या मंदिरात आता भाविकांना संध्याकाळी सहानंतर प्रवेश मिळणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाचा धोका कमी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर हे पूर्वी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेमध्ये भाविकांसाठी उघडण्यात येत होते.
मंगळवार, शुक्रवार आणि सुट्टीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांच्या शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. भाविकांच्या तोंडावर मास्क असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर हात सॅनिटाईज केले जाणार आहेत, भाविकांच्या तोंडावर मास्क असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
या कोरोनाच्या नियमांचा काटेकोरपणे पालन केला जाणार आहे. गेले काही महिने मंदिरे बंद करण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरी सर्व देवस्थाने सुरु करण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असल्याने मंदिरातील दर्शनाची वेळेमध्ये कपात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !


