Share

स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य; न्यायालयाच्या ‘त्या’ सल्ल्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठाने देखील देशातील सर्व न्यायाधीशांना आणि वकिलांनी महिलांच्या कपड्यांबाबत संवेदनशील रहावे, असा सल्ला दिला आहे.

एका प्रकरणावर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने लैंगिक हिंसाचाराचा आरोप असलेल्या एका आरोपीला तक्रारदार महिलेकडून राखी बांधून घेण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या या आदेशाला चुकीचं ठरवले आणि अशा प्रकारच्या आदेशामुळे पिडीत महिलेच्या अडचणी वाढू शकतात असेही सांगितले.

महिलांच्या वर्तनावर वा वस्त्रांवर टिप्पणी करू नका !

महिलांशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना काही ठराविक वक्तव्य अथवा मत व्यक्त करु नयेत. महिला या शारिरीकदृष्ट्या दुर्बल असतात, त्यांना संरक्षणाची गरज असते, त्या स्वत: चा निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत, पुरुष कुटुंब प्रमुख असतो, महिलांनी आपल्या पवित्रतेचे ध्यान राखलं पाहिजे, मातृत्व महिलांचे कर्तव्य आहे, रात्री एकटे फिरणे म्हणजे बलात्काराला निमंत्रण देण्यासारखं आहे, महिलांनी दारू किंवा सिगारेट पिणे म्हणजे पुरुषांना उत्तेजित करण्यासारखे आहे अशा काही टिप्पणी अथवा मत न्यायाधीशांनी व्यक्त करु नयेत असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनांतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सूचनांचं स्वागत केलं आहे. अमृता फडणवीस यादेखील अनेकदा त्यांच्या वेषभूषेवरून वा त्यांच्या गाण्याच्या आवडीवरून ट्रोल होत असतात. त्यामुळे टीकाकारांना देखील त्यांनी यातून अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.

‘सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व न्यायालयांना ड्रेसिंग, वागणूक, पूर्वीचे आचरण, नैतिकता, स्त्रियांची शुद्धता यावर भाष्य करणे किंवा लैंगिक गुन्ह्यांच्या खटल्यांचा निर्णय घेताना ‘तडजोडीचे सूत्र’ सुचवण्यावर मनाई केली आहे. प्रत्येक स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य आहे,’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!