Share

‘बारा बलुतेदारांना आर्थिक मदत करावी’, ओबीसी काँग्रेसची मागणी

Published On: 

बीड : जिल्ह्यामध्ये मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील बारा बलुतेदारातील विविध घटक मोठ्या कोंडीत सापडला आहेत. जिल्हा प्रशासनाने बारा बलुतेदारांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वचिष्ट बडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळी, धोबी, न्हावी, कुंभार, लोहार, सुतार, रंगारी, तेली, कुरेशी, कोळी, बागवान, वाणी समाज अशा अनेक समाजाचे छोटे छोटे व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद पडलेले आहेत. यामुळे हातावर पोट असलेले हे छोटे छोटे समाज उघड्यावर आले आहेत. अनेक जण आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक अडचणीत आलेल्या रिक्षावाले, फेरीवाले यांना जशी मदत केली याच धर्तीवर बारा बलुतेदारांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बीड जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!