🕒 1 min read
नवी दिल्ली : नवी कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. मात्र, खेळाडूंनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले नाही. यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी सरकारला पाठींबा देणाऱ्यांना सुनावले आहे.
‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींच्या विधानांवर भारतीयांनी प्रतिक्रिया देणे लाजिरवाणे आहे. भारताच्या वैश्विक प्रतिमेचे सरकारच्या हट्टीपणामुळे आणि लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणारे नाही. केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या समस्यांचे चर्चेतून निराकरण करावे आणि मगच तुम्हाला एकत्रित, एकसंध भारत पाहायला मिळेल’, असे ट्वीट शशी थरूर यांनी सरकारचे समर्थन करणाऱ्या खेळाडूंवर टीकास्त्र डागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण?; रुपाली चाकणकर यांचा कंगणावर निशाणा
- खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी
- ऑलिम्पिकची तयारी सुरू; जपानमध्ये मात्र स्पर्धेलाला विरोध !
- राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजपने काढला राहुल यांचा खापर पणजोबा!
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
