नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शेतकऱ्यांना मोठं समर्थन देताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी एक ट्वीट करत विचारलं की, ‘जगातील जास्तकरुन हुकूमशहांची नाव M वरुन का सुरु होतात?’. यावर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी उत्तर दिलं आहे.
‘राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काँग्रेसही गंभीरतेने घेत नाही. जर ‘एम’पासून सुरु केलं तर मोतीलाल नेहरु यांचंही नाव येतं. त्यामुळे त्यांना जरा बघून टिप्पणी करायला हवी’. असं तोमर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सेलेब्रेटींचं ‘Tweet Together’; शेतकरी आंदोलनासंबंधित सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट केलं कॉपी
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
- ‘मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी आज गाझीपूर सीमेवर जाणार’
- स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘या’ अटीवर मिळणार आयपीएलमध्ये एन्ट्री
- “माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे”, रहाणेचे मोठे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

