टोकियो: गेल्या वर्षभरापासून कोरोना या जगभर थैमान घातलेल्या महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम केला आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. याला जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जाणारी ऑलिम्पिक २०२० साली जपानची राजधानी टोकियो येथे पार पडणार होती. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऑलिम्पिक स्थगित केली गेली होती.
जगातील क्रीडारसिकांसाठी सर्वात मोठी पर्वणी मानल्या जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० यादरम्यान ही स्पर्धा होणार होती. त्यानंतर, २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात ही स्पर्धा आयोजित करण्याचे नक्की केले गेले होते.यावर आता ही स्पर्धा कोणत्याही परीस्थितीत पार पडणार असल्याच आश्वासन जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिले आहे. याविषयी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी म्हटले की, आम्ही खंबीरपणे स्पर्धेची तयारी सुरू ठेवली आहे. स्पर्धेविषयीची आशा आणि धैर्य जगामध्ये पसरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठरलेल्या काळातच ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातील.
त्यांनतर आता पुन्हा करोना साथीमुळे जुलैमध्ये कशी परिस्थिती असेल, तसेच काही विपरीत गोष्टी घडल्या तर त्याचा फटका देशवासीयांनाही बसणार आहे, त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकला पुन्हा एकदा विरोध वाढताना दिसत आहे. मात्र, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वेळापत्रकानुसारच पार पडेल, असा दावा संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सेलेब्रेटींचं ‘Tweet Together’; शेतकरी आंदोलनासंबंधित सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट केलं कॉपी
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
- ‘मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी आज गाझीपूर सीमेवर जाणार’
- स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘या’ अटीवर मिळणार आयपीएलमध्ये एन्ट्री
- “माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे”, रहाणेचे मोठे भाष्य


