Share

खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते, यावेळी त्यांना क्लिनचीट देखील देण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे तसेच ईडीला जी कागदपत्रे लागतील ती देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. एकनाथ खडसे यांना ईडीने ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले होते.

मात्र ईडीनं खडसेंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने खडसेंनी याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

तत्पूर्वी, खडसेंच्यावतीने कोर्टाला सांगितले होते की, ‘ते आजारी असून ते उपचार घेत आहेत. ईडीनं इसीआयआर पीएमएलए कायद्यानंतर्गत दाखल केला आहे. ते समन्सला कोणतेही उत्तर न देता जर ते शांत राहिले तर ईडीतर्फे त्यांना अटकही केली जाईल. ईडी जर त्यांना अटक करणार नाही अशी हमी देत असेल तर आम्ही याचिका मागे घेऊ. अस मत खडसेंच्या वतीने मांडण्यात आलेले आहे. यामुळे आज कोर्टात होणार्या सुनावणी मध्ये खडसेंना दिलासा मिळतोय का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!