Share

होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना

Published On: 

अहमदनगर : कोरोना लाट मोठी असल्याने कोणीही निष्काळजीपणा करू नये. ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करत घरोघर जाऊन तपासणी करा. लक्षणे आढळल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करा, होम आयसोलेशन बंद करा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या. संगमनेर  अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.

मंत्री थोरात म्हणाले, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात अधिक लक्ष द्यावे. ताप किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास होम क्वारंटाइन बंद करून संस्थात्मक विलीगीकरण करा. कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी केली, तर रुग्ण शोधता येतील. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या.

तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्याकरता आपण राज्यपातळीवरून प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्त्वाचे कोरोना रुग्ण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या प्रभागात घरोघरची काळजी घ्यावी. कोरोना थांबवण्यासाठी स्वयंस्फूतर्ता महत्त्वाची आहे. सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुका कोरोनामुक्तीकडे न्यायचा आहे असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!