कोलकाता : संपूर्ण देशात कोरोनाची भयंकर लाट आहे. पश्चिम बंगालमधील स्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. राजधानी कोलकातामध्ये आरटीपीसीआर तपासणी करणारा प्रत्येकी दुसरा व्यक्ती महामारीने बाधित आढळून येत आहे. उर्वरित राज्यांत प्रत्येकी चारपैकी एक नमूना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. हे प्रमाण एका महिन्यात पाचपटीने वाढले आहे.
कोलकाता व परिसरातील प्रयोगशाळांतील आकडे ४५ टक्के ५५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट सांगू लागल्या आहेत. राज्यातील दुसऱ्या भागात हे प्रमाण सुमारे २४ टक्के आहे. महिन्याच्या सुरूवातीच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्क्यांनी जास्त आहे. एका सरकारी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट यापेक्षा जास्त आहे. लक्षण नसलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. असे लोक तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे.
बंगालमध्ये ८ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्चला झाले. आड सोमवारी ७ व्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या. २९ एप्रिलला ८ व्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तृणमूलसह अनेक पक्षांनी अखेरच्या तीन टप्प्यांसाठी एकाचवेळी मतदानाची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ती नाकारली.
कोरोना स्थितीवर उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले, आम्ही एक महिन्यापूर्वी आयोगाला नोटीस पाठवली होती. बंगालमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. जाहीर सभांवर बंदी घाला अशी मागणी आम्ही तेव्हा केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयोगाने योग्यवेळी पावले उचलली असती तर ही वेळ आली नसती असा दावा त्यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यातील जनतेपेक्षा ममतांना त्यांचा अहंकार महत्त्वाचा’
- नशेच्या गोळ्या विकणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी
- गुंतवणूकीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारूर येथील जगदंबा देवी यात्रा रद्द
- शहराला मिळाला २५ हजार लसींचा साठा, पुन्हा लसीकरणाला सुरुवात


