Share

‘राज्यातील जनतेपेक्षा ममतांना त्यांचा अहंकार महत्त्वाचा’

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. ममता बॅनर्जी या बैठकीत का सहभागी झाल्या नाहीत? आपल्या अहंकारापोटी तुम्ही हा निर्णय घेतला होता का? असा सवाल भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे.

नड्डा म्हणाले, बंगालला कोरोना लस मिळाली नाही, असा दावा ममतांनी केलाय. हा आरोप करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वत:ची १० वर्षांची कारकीर्द आठवून पाहायला हवी. कारण, या काळात तुम्ही जनतेला काहीही सुविधा दिल्या नाहीत. केंद्राकडून पुरवठा होत नसल्यास राज्य सरकार रोज लसीकरण कसे काय करत आहे? असा प्रश्न नड्डांनी केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांची सभा आयोजित केली होती. त्यांनी याप्रसंगी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘मन की बात’ कार्यक्रमात कोणाला रस आहे? नागरिकांना कोरोनाच्या उपाययोजनाबद्दल ऐकायचे आहे. गर्दीत एखादा व्यक्ती १ हजार लोकांना बाधित करू शकतो. अशा परिस्थितीत आरटीपीसीआर टेस्टचे दोन लाख सुरक्षा जवान उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानहून का पाठवण्यात आले? एवढेच नव्हे तर इतर राज्यांतून एक लाख भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बंगाल प्रचारासाठी आणण्यात आल्याचा आरोप ममतांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!