🕒 1 min read
जळगाव : २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष संपलेलं आहे परंतु याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये संभ्रमावस्था आहे. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, प्राथमिकचे सोमनाथ पाटील यांनी ही मागणी केली आहे.
ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी, शिक्षक व पालक तिघेही कंटाळलेले आहेत. प्रत्येक वर्षी मार्चमध्येच शिक्षण विभाग पुढच्या वर्षांच्या कामकाजाच्या नियोजनाचे परिपत्रक काढत असते. त्यानुसार राज्यभरात वर्षभराचे शैक्षणिक उपक्रम, परीक्षा व सुट्या यांचे नियोजन केले जाते. गेल्या वर्षापासुन ही पद्धत बंद केली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वर्षीही राज्याच्या शिक्षण संचालकांनी नियोजनाचे परिपत्रक अद्याप काढलेले नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, व पुढील मुद्द्यांबाबतचा तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही निवेदनात केली आहे. दरम्यान, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही शिक्षकांच्या या मागणीच्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मोदी, ममतांच्या जाहीर सभा महागात, बंगालमध्ये रुग्ण पाच पट वाढले
- ‘राज्यातील जनतेपेक्षा ममतांना त्यांचा अहंकार महत्त्वाचा’
- नशेच्या गोळ्या विकणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी
- गुंतवणूकीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारूर येथील जगदंबा देवी यात्रा रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
