Share

गुंतवणूकीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : शेअर मार्केटशी संबंधित असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अनेकांना एक कोटी ३९ लाख रुपयांना गंडा घालणा-या खान अब्दुल कादर नुसरत इलाही खान (वय ३७, रा.प्लॉट क्र. २, नाहीद मंजिल, बारी कॉलनी) याला जिन्सी पोलिसांनी अटक केली असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. परदेशी यांनी दिले आहेत.

सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या मोहम्मद अजहर रहिमुद्दिन कुरेशी (वय ४३) याची खान अब्दुल कादर याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून खान अब्दुल कादर याने के. मल्टि सव्र्हिसेस फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटिंग, जमीन खरेदी-विक्री व जमीन विकसीत करण्याचा व्यवसाय होतो. त्यातून दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळतो असे आमिष दाखवले होते. त्यामुळे मोहम्मद कुरेशी यांनी २८ लाख रुपये तर इतरांनी फेब्रुवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत एक कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र, परतावा मिळत नसल्याचे पाहून कुरेशी यांनी खान अब्दुल कादरकडे वारंवार पैशांची मागणी केली. तो तसेच त्याचे इतर साथीदार नुसरत इलाही खान, इशरत इलाही खान, नवीद इलाही खान, डॉ. अस्ना रबाब खान अब्दुल कादर खान, सुजात इलाही खान (सर्व रा. सेन्ट्रल नाका, जसवंतपुरा) पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने कुरेशी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यावरुन ९ फेब्रुवारी रोजी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!