औरंंगाबाद : अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाNया शेख शाहरूख शेख हानिफ (वय २६, रा. अजीम कॉलनी, जुनाबाजार) याला सिटीचौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३० गोळ्यांचे दहा पाकेट अशा सुमारे १६२५ रुपयांच्या ३०० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अटकेत असलेल्याशेख शाहरूख याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले आहेत.
या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहीत कैलास गांगुर्डे (वय ३०) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, २३ एप्रिल रोजी गांगुर्डे हे कर्तव्यावर असतांना त्यांना माहिती मिळाली की, टाउन हॉल उड्डाणपुला खाली एक व्यक्ती अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करत आहे.
याआधारे गांगुर्डे आणि त्यांच्या पथकाने दुपारी नशेच्या गोळ्या विक्री करणार्या शेख शाहरूख याला अटक केली. त्याच्याकडून नशेच्या ३० गोळ्यांचे १० पॅकेट अशा सुमारे १६२५ रुध्पयांच्या ३०० गोळ्या जप्त केल्या. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान


