Share

तुकाराम बीज! सलग दुसऱ्या वर्षी नाथ षष्ठी सोहळा रद्द

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी नाथ षष्ठी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आज तुकाराम बिजेला काही मोजक्याच नाथ वंशज, पुरोहित व भाविकांच्या उपस्थितीत रांजनाची विधिवत पूजा करुन रांजण भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पूजा अर्चा करण्यासाठी आधी वीस लोकांना परवानगी देण्यात आली होती. परंतु पुन्हा नवीन आदेश काढून पाचच जणांना पूजा अर्चा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या आदेशामुळे नाथ वंशज, भविकात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आज तुकाराम बीज असल्याने नाथांच्या राहत्या वाड्यातील रांजनाची विधिवत पूजा करून रांजनात गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणून टाकण्यात येते. येथून नाथ षष्ठी यात्रेला सुरुवात होते. ज्या वारकरी, भाविकांच्या हस्ते रांजण भरते त्याला श्रीखंड्या समजून त्याचा नाथ वंशजांच्या हस्ते सत्कार येतो. भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्या वेषात नाथांच्या घरी बारा वर्ष पाणी भरले होते अशी अख्यायिका आहे.

नाथांचे रांजण भरल्या नंतर नाथ षष्ठी यात्रेला सुरुवात होते. षष्ठमीला पहिली दिंडी असते या दिवशी राज्यातून आलेल्या दिंड्या गावातील नाथ मंदिरात दर्शन करून व नगर प्रदर्शना करून आपाल्या फडात निघून जातात.कालाष्टमीला सूर्यास्ताच्या वेळी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजांच्या हस्ते काल्याची दही हंडी फोडली जाते. तसेच नाथ संस्थांच्या वतीने सुद्धा वारकऱ्यांच्या हस्ते दही हंडी फोडून नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता होते.

काल्याच्या प्रसाद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी भाविक आपापल्या गावी परत फिरतात.परंतु यावर्षी सुद्धा हे चित्र दिसणार नाही कारण कोरोना च्या पार्श्वभूमीवर नाथ षष्ठी सोहळा यावर्षी सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी नाथ मंदिरात पोलिस बंदोबस्त लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!