Share

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल

Published On: 

मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल चाचण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. तपासणीनंतर त्यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर, उद्या म्हणजेच बुधवारी ३१ मार्च रोजी एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.

मात्र, आज पुन्हा एकदा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे या देखील त्यांच्यासोबत आहेत. पोटात दुखू लागल्यामुळे ते आजच रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, काल त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं समजताच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेत्यांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. लवकरात लवकर प्रकृती सुधारावी अशा सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!