Share

भाजपच्या वतीने लॉकडाऊन विरोधाबाबत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Published On: 

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी औरंगाबाद ग्रामीण यांनी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे घोषित केलेल्या लॉकडाऊन हा व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे. अगोदरच वर्ष भरापासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र विस्कळीत झालेले आहे. या बाबत लॉकडाऊनच्या बाबत जिल्हाधिकारी यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, 31 मार्च ते 9 एप्रिल प्रयंत लावण्यात येत असलेल्या लॉक डाऊनचा विरोध व निषेध भाजप करत आहोत.  वर्षभरातील बंद काळात सुद्धा बँकेचे हफ्ते त्यावरील व्याज, लाईट बील, दुकानाचे भाडे सरकारी अनेक प्रकारचा टॅक्स, नौकर वर्गाचा पगार, हा बंद काळातला सुद्धा भरावे लागत आहे. बँका कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवत आहे. महावितरण वीज कट करत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग हा अगोदरच बुडाला आहे. असे असताना तसेच शासन कोरोनाला रोखण्यात आलेल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी पुन्हा व्यापाऱ्यांवर तसेच  नागरिकांवर लॉकडाऊन चे भूत उभे केले आहे.

लॉकडाऊन  हा पर्याय नाही, हे सरकारमधील नेते म्हणत आहेत. असे असताना सुद्धा फक्त आणि फक्त सरकारचे अपयश झाकण्यााठी लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचा भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी औरंगाबाद निषेध करून विरोध देखील करत आहे. अश्या या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. त्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष – विनोद मंडलेचा, मराठवाडा संघटक मुकेश जैन, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधवर, उपाध्यक्ष महेश श्रीकांत, चिटणीस संदीप मुथा यांची या वेळी उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!