मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) प्रचंड चर्चेत आले आहे. या प्रकरणापासून मलिक केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप करत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले. एवढेच काय तर याचे माझ्याकडे पुरावे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे नवाब मलिक म्हणाले की, काही अधिकारी लोक माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून इमेल करत आहेत, आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावत आहेत. केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवलं जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेतत्यामुळे मी याविरोधात मी कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील तक्रार करणार असून याची चौकशी करायला सांगणार असल्याचे मलिक म्हणाले.
पुढे मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची आणि ऑफिसची माहिती घेत असल्याचे समोर आले. माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात यावर देखील त्यांचं लक्ष आहे. मी दुबईला असताना दोन जण माझ्या घरचे फोटो काढत होते. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं आहे, असं मलिक यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; ‘या’ खेळाडूकडे असणार कर्णधारपद
- इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिराग यांची विजयी घोडदौड
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
- टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भयभीत होता; इंझमामचे बेधडक वक्तव्य
- ‘भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असून पाश्चात्य माध्यमांना भारताची प्रगती बघवत नाही


