Share

पूजा चव्हाण प्रकरणात सत्य बाहेर आलेच पाहिजे-रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावरून थेट हल्ला केला असताना केंद्रीय राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज यावर आपली प्रतिक्रिया दिली.

आत्महत्येच्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे, यासंदर्भात याबद्दल पत्रकारांनी दानवे यांना विचारले असता त्यांनी ज्या पक्षांनी महिलावरील अन्याय, अत्याचार विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केली, त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सत्य बाहेर आणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांचे याकडे लक्ष वेधले आहे. फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिपही नगराळे यांना पाठवल्या असून संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!