Share

औरंगाबादेतील सिडको-हडको फ्री फोल्ड करण्याची मागणी

Published On: 

औरंगाबाद : शहरातील सिडको-हडको लिझ होल्डचे फ्री फोल्ड करण्याची मागणीचे निवेदन औरंगाबादचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. शनिवारी विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाला मंत्री शिंदे आले होते. यावेळी त्यांना निवदेन देण्यात आले.

२००६ मध्ये सिडको-हडको हे महानगर पालिकेस हस्तांतर करण्यात आले होते. त्यावेळी सिडको आणि महानगरपालिका यांच्यात झालेल्या करारात सिडकोचे ना हरकत घेणे व नकाशा मंजुर करून घेणे, व त्यांनी दिलेल्या चटई क्षेत्र (एफएसआय) अशी एक अट आहे. त्यामध्ये नागरिकांना सद्यस्थितीमध्ये दोन नियोजन प्राधिकरण (प्लॉनिंग ऑथरिटी) आहे. त्यामुळे नागरिकांना दोन प्राधिकरण असल्यामुळे अनेक प्रकारचे नाहक त्रास, परवानगी साठी दोन्ही ठिकाणी पैसे भरावे लागत आहे.

सिडको-हडको हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आपल्या लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना रेडिरेकनर प्रमाणे वाढीव शुल्क आकारून लिझ होल्ड फ्री होल्ड करुन दिले होते. परंतू जास्त शुल्क असल्याने एकाही मालमत्ता धारकाने या योजनेचा लाभ घेतला नाही. या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!