औरंगाबाद : मलशुद्धीकरणासाठी गंगापूर नगर परिषदेने खरेदी केलेली जमिनी बेकायदेशीर आहे. गंगापूर शहरातील नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष संजय जाधव व माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नगरपालिकेने पूर्णपणे बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत मलशुद्धीकरण प्लांटसाठी जमीन खरेदी केली होती. हा जमीन खरेदी व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर व चुकीचा आहे असा आरोप संजय जाधव यांनी केला.
शासन निर्णय व इतर नियमाप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळ, स्मशानभूमी, शैक्षणिक संस्था, लोकवस्ती या परिसरात मलनिस्सारण प्रकल्प घेता येत नाही. नगरपरीषदेने खरेदी खतातील जमीनीजवळ २०० फूट अंतरावर मुस्लिम समाजाचे कब्रस्तान व धार्मिक स्थळ आहे तसेच गट क्रमांक २४६ /२ मधील नवीन ईदगाहच्या पाठीमागे ४० आर ही जमीन नगरसेवकाकडून खरेदी केली आहे. या दोन्ही खरेदी नियमबाह्य आहे. शासन नियमानुसार या कामासाठी जमीन घेताना शासन नियमाने धार्मिक स्थानापासून किमान सहाशे मीटर अंतर दूर असले पाहिजे किंवा शहरापासून एक किलोमीटर लांब अंतरावर असले पाहिजे.
या संबंधात जिल्हाधिकारी यांनी १ फेब्रुवारी रोजी दिलेली परवानगी देखील पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे माजी नगराध्यक्षांनी सांगितले. मलनिस्सारण प्रकल्प हा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा आहे त्यामुळे पर्यावरण विभाग औरंगाबाद, भूजल संरक्षण महाराष्ट्र शासन यांची देखील परवानगी घेतलेली नाही. तसेच मलनिस्सारण प्रकल्पासाठी जमिनीला परवानगी देतांना संयुक्त मोजणी देखील एकतर्फा करण्यात आली. असे आरोप संजय जाधव यांनी केले.त्यामुळे झालेले खरेदीखत बेकायदेशीर आहे.या प्रकरणात नगरपालिकेने बेकायदेशीरपणे परवानगी दिली असल्याचा आरोप करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणालाही पाठीशी घालणार नाहीत; संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- जावई हर्षवर्धनच्या प्रश्नावर भडकले रावसाहेब दानवे, म्हणाले…
- ‘उद्धव ठाकरेंना पूजा चव्हाण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही’
- ….तर बंद करून टाका पोलीस स्टेशन आणि कोर्ट; निलेश राणेंचा घणाघात
- पूजाचा मृत्यू चक्कर येऊन पडल्यामुळे झाला ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

