Share

अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला भरपूर दिले-मंत्री रावसाहेब दानवे

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकारने नुकतेच देशाचे बजेट जाहीर केले. या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळाले नाही अशी ओरड विरोधी पक्षांकडून होत आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा पाढाच वाचून दाखवला. आपापल्या मतदारसंघात भाजप खासदारांनी बजेटबद्दल माहिती देण्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्या अनुषंगाने जालन्याचे खासदार दानवेंनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पातील मुद्दे स्पष्ट केले.

ते म्हणाले, अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तावेज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांचा विचार करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात भरपूर तरतूद करण्यात आली आहे. विरोधक काहीही म्हणत असलेलं तरी पुणे, नाशिक, मुंबई मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली आहे. ३५ हजार कोटी रुपयांची कोरोना लसीसाठी तरतूद आहे. १० हजार किलोमीटर लांबीचे ३२८ रस्ते करण्यात येणार आहे, अशा अनेक योजनांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्राच्या तरतुदीतून राज्य सरकारने विलंब न करता कामे केली तर यापेक्षा अधिक निधी केंद्राकडून देण्यात येईल असे दानवे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!