औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायतचा औरंगाबाद मनपात समावेश करण्याच्या प्रस्तावाला या भागातील सर्वच गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला आहे. याविराेधात लढण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत एक कृती समितीही स्थापन करण्यात आली. या परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे तर मनपा देखील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यानाच शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मनपावर भरवसा नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायती महानगर पालिकेत सामाविष्ट करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणत सुरु आहे . तर त्याला ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने वाळूज एमआयडीसी परिसरात एक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
यामध्ये ‘संत गाडगेबाबा ग्रामपंचायत बचाव कृती समिती, संभाजीनगर’ अशी एक सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी तिसगावचे राजेश रामचंद्र कसुरे यांची, तर सचिव म्हणून वडगावचे सरपंच सचिन गरड यांची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- महिला अधिकाऱ्यांनी पकडला दीड लाखांचा गुटखा
- जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २३ ठिकाणी टाकणार जलवाहिनी
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

