औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया केल्यावर ‘जीव्हीपीआर’ या कंपनीला पाणी पुरवठा योजनेचे काम मिळाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २३ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असतानाच जलवाहिनी टाकण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.
वर्क ऑर्डर दिल्यानंतर कंत्राटदार कंपनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षणाचे, जमिनीच्या मोजणीचे व जलकुंभांच्या बांधकामाचे काम सुरु केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंह म्हणाले, ‘पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या सुमारे ४५ किलोमीटरच्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ४५ किलोमीटरच्या टप्प्यात जलवाहिनी टाकण्यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूला जागा उपलब्ध आहे, त्यामुळे नव्याने भूसंपादन करण्याची गरज नाही. औरंगाबाद शहरात देखील नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाच्या अनुशंगाने सुमारे पाच किलोमीटरचे सर्वेक्षण झाले आहे.’
नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राबरोबरच संतुलित जलकुंभ (एमबीआर) देखील याच ठिकाणी बांधला जाणार आहे. या दोन्हीही कामासाठी १५ हेक्टर जागेची गरज आहे. या जागेची मोजणी भूमिअभिलेख कार्यालयाकडून करण्यात आली आणि जागा देखील जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते असे अजय सिंह यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
