Share

महिला अधिकाऱ्यांनी पकडला दीड लाखांचा गुटखा

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड शहरातील एका दुकानावर छापा मारत अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यांनी १ लाख २९ हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला. ही कारवाई गुरुवारी नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स मधील राज ट्रेडर्समध्ये करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून छापा मारताच आरोपी पळून गेला.

आमेर शेख सलीम (२५, रा. भारतनगर, सिल्लोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनिय शाखेच्या मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी राज ट्रेडर्सवर छापा मारला. यात गोवा, हिरा, राजनिवास, विमल आदी गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखुचा साठा मिळून आला. महिला अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांच्या मदतीने सर्व गुटखा जप्त करुन ठाण्यात आणला व दुकान सील केले.

ही कारवाई औरंगाबाद अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, सुलक्षणा जाधवर यांनी केली. दरम्यान शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी अचानक गुटखा विक्रेत्यावर छापा मारून लाखोचा माल जप्त केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शहरात एकच खळबळ उडाली. सिल्लोड शहरात व तालुक्यात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात गुटख्याचा काळाबाजार सुरू असून सदरील कारवाई अधिक तीव्र स्वरूपात केल्यास मोठ्या प्रमाणात गुटखा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!