बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला उच्च न्यायालयाकडून मुदतवाढ प्राप्त झाली आहे. आहे त्याच संचालक मंडळाने बाजार समितीचा कारभार चालवावा, असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे नेमण्यात आलेले प्रशासकीय संचालक मंडळ रद्द ठरवून आहे त्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळालेत. यामुळे भाजप आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा गटाची बाजार समितीवर पुन्हा मजबूत पकड निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे शासनाने मुदत संपलेल्या सर्वच बाजार समित्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. अंबाजोगाईच्या बाजार समितीलाही मुदतवाढ मिळाली. मात्र, येथील एका गटाने संचालक मंडळाऐवजी प्रशासक नेमणुकीसाठी मंत्रालयातून अधिकार आणले. ज्यामुळे बाजार समितीवर काही दिवस प्रशासकाची नेमणूक केली. त्यानंतर दोन महिन्यांनी प्रशासकीय संचालक मंडळ बाजार समितीवर आणले. बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, राजूशेठ भन्साळी, राजाभाऊ गंगणे व इतर संचालकांनी या प्रशासकाच्या निवड प्रक्रियेस न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ दिली. त्यामुळे नुकताच या संचालक मंडळाने पदभार स्वीकारला.
मुंदडांनी पक्षांतर केल्याने समीकरणे बदलली
बाजार समितीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते अक्षय मुंदडा आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येऊन बाजार समितीवर प्राबल्य मिळवले होते. मुंदडा गटाचा सभापती तर मुंडे गटाचा उपसभापती असे यावेळी ठरवण्यात आले. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान अक्षय मुंदडा, नमिता मुंदडांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासकाच्या माध्यमातून कुरघोडीचे राजकारण सुरू होते. मात्र, या राजकारणावरही मात करत मुंदडा गटाने पुन्हा बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाला धक्का बसल्याची चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
