Share

…म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबादमधील पद‌मपुरा येथील कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णाचा डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे आता महिलांच्या सुरक्षेसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्वच कोविड केअर सेंटरवर महिला सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांतील कोविड सेंटरवर आता महिला सुरक्षा रक्षकांची नेमनुक करण्यात येणार आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी औरंगाबाद मनपाचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याशीही चर्चा केली असून पद‌मपुरा प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच केंद्रेकरांशी चर्चा करून काही सूचना केल्या. कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेबाबत ‘एसओपी’ लवकरच तयार केल्या जाणार आहे. महसूलचे उपायुक्त, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारीही कोविड सेंटर्सना नियमित भेटी देणार असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळाली आहे.

डॉक्टरने महिलेकडे केली होती शरीरसुखाची मागणी
औरंगाबाद येथील पदमपुरा भागातील कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्याच्या नावाखाली डॉक्टरने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला होता. संबंधित महिला २३ फेब्रुवारी रोजी पदमपुरा येतील मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती झाली. त्यानंतर ३ मार्चला उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज मिळणे अपेक्षित होते. दरम्यान, २ मार्च रोजी या सेंटरमध्ये कामाला असलेल्या डॉक्टरने मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमासार महिलेला केबिनमध्ये बोलावून घेतले. ‘तुमचे डिस्चार्ज पेपर तयार करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आणखी तीन दिवस इथे थांबावे लागेल,’ असे त्याने महिलेला सांगितले. त्यावर महिलेने उद्याच डिस्चार्ज द्या, अशी विनंती केली. त्यावर ‘तुझी विनंती मान्य करायची असेल तर मी सांगतो तसे कर’ असे म्हणत या डॉक्टरने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. दरम्यान, महिलेने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार दिली. त्यांनंतर चौकशी करून संबंधित डॉक्टरचे काम तात्काळ थांबवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!