Share

‘शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळं विकली गेली असती, ना…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

उद्या म्हणजेच डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

या बंदमध्ये राज्यात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. राज्यातील काँग्रेसचे अनेक मंत्री देखील या आंदोलनात सामील झाले होते. आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मोदी सरकारसह भाजपवर खोचक टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळे विकली गेली असती, ना रेल्वे स्टेशन, ना LIC, ना BPCL विकली जाती, ना बेरोजगारी वाढली असती, ना जीडीपी घसरला असता’ अशी चारोळी टाकत त्यांनी भाजप सरकार आल्यानंतरच्या परिस्थितीवरून घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!