अहमदनगर : शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.
संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?’ असा सवाल करत त्यांनी शिर्डी संस्थानने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.
आता त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे तसेच मंदिराचे पावित्र्य कसे राखावे मंदिरात जाताना आपण कसे कपडे घालावेत याचे भान भक्तांना असते त्यामुळे अशा पद्धतीचा जाहीर बोर्ड लावून भक्तांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न साई संस्थानच्या माध्यमातून चालला आहे त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी तक्रार तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेल द्वारे केली आहे.
श्रध्दा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे म्हणूनच पुन्हा एकदा संस्थानला तृप्ती देसाई यांनी विनंती केली आहे की “आपण सदर बोर्ड तातडीने काढून टाकावा अन्यथा 10 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आम्हाला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढावा लागेल.” त्यामुळे सद्य त्यांनी ही विनंती केली असली तरी हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांच्या आरोग्यासाठी भाजपची प्रार्थना!
पुणे : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान
सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
मुंबईकरांना लोकल प्रवासाचा दिलासा मिळणार? येत्या ११ आणि १२ तारखेला महत्वाची बैठक
सरनाईकांना ईडीचं पुन्हा एकदा समन्स; मात्र चौकशीसाठी हजर नाहीच


