🕒 1 min read
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान असल्याने या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत.
कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, फेसशिल्ड आदी साहित्याचा समावेश असलेले किट देण्यात आले आहे.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदार संघात एकूण मतदार 4 लाख 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
-
व्याजदर निर्णयासाठी आरबीआयची बैठक सुरू; विकास दर अंदाजात सुधारणा?
-
पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत
-
फडणवीस-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या सर्वच जागा भाजपा जिंकेल : राणे
-
औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात,बहुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
