मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे अनेक समन्स बजावण्यात आले. मात्र, तरीही ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत.
सोमवारी विहंगला चौथा समन्स बजावण्यात आला होता. यानुसार १ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत त्याला हजर राहायला सांगण्यात आले होते. पण विहंग चौथ्या समन्सनंतरही ईडी कार्यलयात हजर झाला नाही. यानंतर, दोन दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे.
आज प्रताप सरनाईक व विहंग यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावला होता. मात्र ते अजूनही चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेलेले नाहीत. त्यामुळे, आता ईडी विहंग याच्यावर कडक कारवाई करण्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप ग्रुपमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंडोले यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
शहीद संग्राम पाटील यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील मावळलेले हास्य परत फुलू दे !
पुणे : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान
सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
मुंबईकरांना लोकल प्रवासाचा दिलासा मिळणार? येत्या ११ आणि १२ तारखेला महत्वाची बैठक
पुण्यात ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, रुपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

