Share

संजय राऊतांच्या आरोग्यासाठी भाजपची प्रार्थना!

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे सद्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत चाणक्य म्हणून ओळखले जातात. काही मागण्यांमुळे भाजपशी असलेल्या संसार मोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. २०१९ निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात घडलेलं राजकीय नाट्य हे अविस्मरणीय आहे.

या सर्व घडामोडींमागे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांची देखील महत्वाची भूमिका राहिली होती. काल, संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर आज अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. संजय राऊत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया होणार असून मागील वर्षीपासून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेली कटुता व एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत कट्टर विरोधक झालेल्या या पक्षांमधील नेत्यांमध्ये अजूनही काहीसं सख्य असल्याचं दिसून आलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊतांच्या आजारपणावर प्रतिक्रिया दिली आहे.

उपाध्ये म्हणाले, संजय राऊत हे उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. तर, दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्याची संधी देखील सोडली नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!