मुंबई:- सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे, असं सांगत सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. पण पवारांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण पवारांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असं पवारांनी सांगितलं. दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मात्र, शेलार यांच्या या विधानावर भाजपमधून नाराजी व्यक्त झाल्यावर त्यांनी लगेचच सारवासारव केली होती. पुण्यात एका पत्रकार परिषदेत शेलार यांनी आमचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असं सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
व्याजदर निर्णयासाठी आरबीआयची बैठक सुरू; विकास दर अंदाजात सुधारणा?
पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत
‘या दोन तोंडी मांडगुळांची तेव्हा कुठे गेलेली मराठी अस्मिता?’
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


