नवी दिल्ली- अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली असून आपण अफगाणिस्तानवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. आपल्या सैनिकांनी अध्यक्षांचा प्रासाद ताब्यात घेतल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यानं माध्यमांना कळवलं आहे. अफगाणिस्तानचं सरकार कोसळलं आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी पळून गेले आहेत. त्यामुळे युद्ध संपल्याचं आम्ही घोषित करत आहोत असं या प्रवक्त्यानं सांगितलं.
काबूलमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून तिथले रहिवासी आणि परदेशी नागरिक अफगाणिस्तानमधून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे कर्मचारीच निघून गेले असल्यामुळे लोक थेट विमानांकडे धाव घेत असल्याचं तिथं उपस्थित असलेल्या एकानं दूरचित्रवाणी वाहिनीच्या कर्मचाऱ्याला सांगितलं.
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जबाबदार धरले असून जो बायडेन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.बायडेन यांनी अफगाणिस्तानमध्ये जे होऊ दिलं, त्यासह देशातील करोना रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
सीमेवर भयानक परिस्थिती असून सगळं उद्ध्वस्त झालंय. तर, देशातील अर्थव्यवस्थाही बायडेन यांनी अपंग करून सोडली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा देऊन द्यायला पाहिजे. जो बायडेन यांनी राजीनामा देणं ही गोष्ट फार मोठी समजायचं कारण नाही. असंही ते देशातल्या पहिल्या स्थानासाठी निवडून आलेले नाहीत.”असं ट्रम्प म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- लाज वाटली पाहिजे! समाजवादीच्या खासदाराला राष्ट्रगीतच येईना, पहा ‘हा’ व्हिडिओ
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा


