Share

“त्या” कीर्तनकारांचे नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी – तृप्ती देसाई

Published On: 

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील ४० वर्षीय महिला यांचा एक अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासांदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना तृप्ती देसाई म्हणाल्या की,‘एका प्रतिष्ठित कीर्तनकाराचे, कीर्तनकार महिलेबरोबर संभोग करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले असून ते मला प्राप्त झाले आहेत.’ कीर्तनकारांच्या नावासहित कारवाईची मागणी करणार असल्याचेही काल (९ एप्रिल) तृप्ती देसाई म्हणाल्या. तसेच यासंदर्भात आज (१० एप्रिल) प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्या म्हणाल्या की,‘त्या महाराजांनी जाणीवपूर्वक ठरवून तो व्हिडिओ बनवला असून तो मी पाहिला आहे. थोड्याच वेळात त्या महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार’, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या महिलेवर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!