टीम महाराष्ट्र देशा : देशाचे महत्वपूर्ण मानले जाणारे तिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरु आहे. त्यामुळे लोकसभेत तीन वेळा मंजूर झालेले विधेयक देशाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत टिकणार का ? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. तर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ सभागृहात भाषण केले आहे. तिहेरी तलाक विधेयक ही तर सुरुवात आहे. यापुढे हे सरकार अनेक जुलमी कायदे हटवणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, हे सरकार मुल्लांचा कायदा बाजूला काढून संपूर्ण देशाला संविधानाच्या कायद्यात आणत आहे. तिहेरी तलाक प्रतिबंध कायदा ही तर सुरवात आहे. समान नागरी कायद्याच्या दृष्टीने हे पाहिले पाऊल आहे. भविष्यात कलम ३७० आणि ३५ अ हे कायदे देखील काढले जाणार आहेत. त्यामुळे मी तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याच्या समर्थनात आहे.

दरम्यान राज्यसभेत भाजप पक्षाला बहुमत नसल्याने तिहेरी तलाक विधेयक पारित होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभेत मंजूर झालेले विधेयक राज्यसभेत रखडले आहे. विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांची संख्या ही समर्थनात मतदान करणाऱ्यांच्या संख्ये पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत नामंजूर होणार असल्याचं दिसत आहे.
#पक्षांतर : गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली; जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका
इस्लाममध्ये लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट, सात जन्माच बंधन नाही : ओवेसी
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

