टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत आज अतिशय महत्वपूर्ण अशा तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु आहे. हे विधेयक आता चर्चेच्या अंतिम टप्यात आले आहे. मात्र या विधेयकावर चर्चा करताना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार विरोध करत धक्कादायक वक्तव्य केले आहे.
इस्लाममध्ये लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याला सात जन्माच्या बंधनात अडकवू नका असे ओवेसी म्हणाले आहेत. नवरा तलाक देत असेल तर त्याला मेहरच्या रकमेच्या कितीतरी पटीने अधिक पैसे पत्नीला द्यावे लागतात, असे ही ओवेसी म्हणाले. 23 लाख हिंदू महिला त्यांच्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. त्या महिलांसाठी हे सरकार काहीच का करत नाही, असा सवाल देखील ओवेसींनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. यावेळी ओवेसी यांनी काही मुद्दे उपस्थित करत मोदी सरकारला सवाल केले. तर ओवेसींच्या या तर्क – वितर्कानंतर भाजप खा. पूनम महाजन यांनी महिलांची बाजू मांडत ओवेसींचे प्रश्न खोडून काढले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

