टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर शिवसेना पक्षप्रमुख यांनी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ शिवसेनेत येणार नाही अस विधान केले आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेकडून अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे भुजबळ आता राष्ट्रवादीतच राहणार असल्याने शरद पवारांना दिलासा मिळाला आहे.

शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चांचं छगन भुजबळांनी देखील खंडन केलं होतं. मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, या बातम्या खोट्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. सचिन अहिर आणि माझा मुळचा मतदारसंघ भाखयळा जवळ असल्याने या चर्चा सुरु झाल्या असाव्या, असा अंदाज छगन भुजबळ यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.
राष्ट्रवादीला अजून एक धक्का; ‘या’ माजी आमदाराने दिली सोडचिट्ठी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

