औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील येसगाव नंबर २ येथे प्रभाकर रंगनाथ खंडागळे यांच्या शेतात मल्टिलेयर किचन गार्डन करण्यात आले. वाढत्या रसायनिक खताच्या प्रादुर्भावामुळे शरिरावर खाललेल्या अन्नाचा दिवसेंदिवस दुष्परिणाम होत असल्यामुळे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे भाजीपाला भेटणे दुरापास्त झाले होते. त्यालाच वरदान म्हणून मल्टिलेयर किचन गार्डन वरदान ठरले आहे.
फुलंब्री व खुलताबाद तालुक्यातील वातावरण बदल अनुकुलन शेती कार्यक्रम अंतर्गत प्रकल्पातील २१ गावांतील सहाय्यक कृषी तज्ञ यांचे मल्टिलेयर किचन गार्डन (बहुवार्षिक परसबाग) याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी लोकसाथी प्रतिष्ठानचे क्लस्टर कॉर्डिनेटर नवथर, अमोल चव्हाण, वडगाव व ताजनापूर क्लस्टरचे सर्व २१ सहाययक कृषी तज्ञ, कृषितज्ञ नागरे, सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. या प्रयोगाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून, या प्रशिक्षणाचा उपयोग शेतीत चांगल्या प्रमाणात होण्याची तज्ञांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

