Share

वैष्णवदेवी मंदिरातील दुर्घटना अत्यंत दु:खद-नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जम्मू मधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर २० भाविक जखमी झाले आहेत. त्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

नारायण राणे म्हणाले, ‘माता वैष्णव देवी मंदिरात झालेल्या दुर्घटनेची बातमी अतिशय दु:खद आहे. जखमी भाविक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. ॐ शांति’, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

दरम्यान जखमींवर नारायण रुग्णालयात उपचार सुरु असून ही चेंगराचेंगरी अतिशय भीषण असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी बचाव पथक तसेच जवान यांच्याकडून बचावकार्य केले जात आहे. मात्र या घटनेवरून अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे. या भागात ५० हजार भाविक जमल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे नियोजन करण्यात न आल्याने ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वैष्णो देवी यात्रेच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला जात असतानाच जखमींना तसेच मृतांना मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांना १० लाख तर जखमींना २ लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर “माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्रातील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी तातडीने कटरा येथे जात आहे’, असे ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!