नवी दिल्ली: जम्मू मधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर २० भाविक जखमी झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे.
दरम्यान जखमींवर नारायण रुग्णालयात उपचार सुरु असून ही चेंगराचेंगरी अतिशय भीषण असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी बचाव पथक तसेच जवान यांच्याकडून बचावकार्य केले जात आहे. मात्र या घटनेवरून अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे. या भागात ५० हजार भाविक जमल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे नियोजन करण्यात न आल्याने ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वैष्णो देवी यात्रेच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला जात असतानाच जखमींना तसेच मृतांना मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांना १० लाख तर जखमींना २ लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर “माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्रातील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी तातडीने कटरा येथे जात आहे’, असे ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे’
- उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ‘ते’ वक्तव्य ठरलं खरं!
- भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करून पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
