🕒 1 min read
नवी दिल्ली: देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
दरम्यान येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल वेगळी असणार आहे.
बच्चे सुरक्षित, तो देश का भविष्य सुरक्षित!
नववर्ष के अवसर पर आज से 15 से 18 वर्ष की आयु के बच्चों के #COVID19 टीकाकरण हेतु COWIN पोर्टल पर रेजिस्ट्रेशन शुरू किए जा रहें है।
मेरा परिजनों से आग्रह है की पात्र बच्चों के टीकाकरण हेतु उनका रेजिस्ट्रेशन करें। #SabkoVaccineMuftVaccine
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) January 1, 2022
भारत सरकारने लहान मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी पूर्वीसारखीच पद्धत वापरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल अशा विध्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे ओळखपत्र देखील वापरता येणार आहे. https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे’
- जम्मूमध्ये वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, १२ जणांचा मृत्यू
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
