Share

संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा

Published On: 

पुणे- देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे.

एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्य सरकार पुन्हा टाळेबंदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. राज्यसरकारच्या धरसोड वृत्तीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठे अस्वस्थ झाले असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना बंदीचे आदेश दिले आहेत. या निर्बंधांमुळे पुण्यातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारच्या नियमांविरोधात जाऊन दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता.

या पार्श्वभूमीवर काही निवडणूक व्यापारी संघटेनच्या सभासदांना काल पुण्याचे विभागीय आयक्त सौरभ राव यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. गेले आठवडाभर दुकाने बंद असून देखील रुग्णसंख्येवर परिणाम झालेला नाही. रुग्णसंख्येचा आलेख हा वाढतच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यापेक्षा योग्य खबरदारी बाळगून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

यासोबतच, ई-कॉमर्स(फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, आदी) व्यवसाय सुरु आहेत. त्यांच्या डिलिव्हरी देखील सुरु आहे यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. जर बंद करायचेच असेल तर सरसकट बंदी घालून लॉकडाऊन करावा, अन्यथा आक्रोश होऊन दुकाने उघडावी लागतील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ग्राहक हे व्यापाऱ्यांचे दैवत आहे. ग्राहक आणि व्यापारी बाधित झाल्यास त्याचा परिणाम होईल. पुणे करोनामुक्त करण्यास आमचा पाठिंबा आहे. मात्र, कारखाने, उद्योगधंदे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या, ई-कॉमर्स सुरू ठेवण्याची भूमिका योग्य नाही, असेही पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन केला तर पुण्यातील व्यापारी वर्गाचा त्याला पाठिंबा देतील. मात्र, जर संपूर्ण लॉक डाऊनचा निर्णय घेतला नाहीतर मात्र गुरुवारपासून आम्ही दुकाने उघडणार अशी माहिती रांका यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!