Share

पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू

Published On: 

मुंबई : आयपीएलमधील सोमवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाचा आखेरच्या चेंडुवर चार धावांनी विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या २२२ धावांच्या बलाढ्य धावसंख्येपुढे राजस्थान रॉयल्सने जोरदार लढत देत सामना खेचून आणला. मात्र आखेरच्या चेंडुवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना कर्णधार सॅमसन हा बाद झाला. या सामन्यात पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

यंदाच्या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एक षटकार मारताच आयपीएलमध्ये ३५० षटकार मारण्याचा नवा किर्तिमान स्थापन केला आहे. या सामन्याआधी ख्रिस गेलच्या नावे ३४९ षटकार होते. राजस्थानचा गोलंदाज बेन स्टोक्सच्या आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडुवर षटकार ठोकत त्याने आयपीएलमधील ३५० षटकार पुर्ण केले. षटकाराच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे.

एबीने १६९ सामन्यांत २३५ षटकार लगावले आहे. सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने १८२ डावांमध्ये २१६ षटकार लगावले आहे. मात्र पहिल्याच सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला त्यामुळे त्याच्या षटकारांमध्ये कोणताच बदल झालेला नाही. या आयपीएलमध्ये पहिला षटकार आणि चौकार लगावण्याचा मान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मिळाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!